‘आधार’साठी उद्या रक्ताचे नमुने मागाल !

47
supreme_court_295

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

२०१६ च्या ‘आधार’ कायद्याने यूआयडीएआयला देण्यात आलेल्या अमर्याद अधिकाराबद्दल सर्वोच्च न्यायालयाने तीव्र चिंता व्यक्त केली आहे. ‘सध्या बोटांचे ठसे घेता, डोळय़ांचे स्कॅन करता. उद्या डीएनए टेस्टसाठी रक्ताचे नमुनेही मागाल,’ अशा शब्दांत न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांनी केंद्र सरकारला फैलावर घेतले. ‘आधार’ कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱया याचिकांची एकत्रित सुनावणी घटनापीठासमोर सुरू आहे.

न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या सवालावर ‘उद्याचे काही सांगता येत नाही’ असे उत्तर केंद्र सरकारचे वरिष्ठ वकील के. के. वेणुगोपाल यांनी दिले. ते पुढे म्हणाले की, ‘आधार’साठी रक्त, लघवी, लाळेचे नमुने मागितले जाणे शक्य आहे. पण त्यावेळी असंख्य स्वयंसेवी संघटना त्याविरोधात उभ्या ठाकतील. आव्हान देतील. तेव्हा न्यायालय काय योग्य, काय अयोग्य याचा फैसला करू शकते.

आपली प्रतिक्रिया द्या