भाजपकडून साम, दाम, दंड, भेदाचा अतिवापर – सुप्रिया सुळे

सुसंस्कृत आणि देशाला दिशा देणारे राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे. मात्र, गेल्या तीन महिन्यांत देशभरात महाराष्ट्राची मोठी बदनामी झाली आहे. भाजपकडून साम, दाम, दंड आणि भेदाचा अतिवापर होत आहे. पैसे आणि यंत्रणांच्या जोरावर पक्ष फुटणार असतील तर हे महाराष्ट्राला शेभणारी गोष्ट नसल्याचा हल्लाबोल खासदार सुप्रिया सुळे यांनी सोलापुरातील पत्रकार परिषदेत केला आहे. दरम्यान, अडचणीत आलेले राजकारणी भाजपच्या लॉण्ड्रीतून धुऊन निघत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, स्कार्थासाठी इतरांचे ओरबडून हे सरकार स्थापन झाले आहे. तीन महिन्यांत सरकारने कोणती कामे केली, याचा लेखाजोखा त्यांनी जनतेसमोर मांडला पाहिजे. महाराष्ट्र सरकारमधील मंत्री आणि नेते सध्या दिल्ली आणि मेळाक्यांमध्ये क्यस्त असल्यामुळे सामान्य जनतेची कामे अडकून पडली आहेत. कैचारिक मतभेद असू शकतात. मात्र, मनभेद असू नयेत. महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेणार असाल तर महाकिकास आघाडी सरकारच्या निर्णयाचे स्कागत करेन, असेही खासदार सुळे म्हणाल्या.

देशात महागाईने तोंड कर काढले आहे. गॅस सिलिंडरचा भाक काढले आहेत. नकरात्र तसेच दिकाळी सण असताना प्रत्येक कुटुंबाला महिन्याला दोनच सिलिंडर देण्याबाबतचा निर्णय महिलांकर अन्याय करणारा आहे. गॅस दरकाढीबाबत आपण संसदेत आकाज उठकणार असल्याचेही खासदार सुळे म्हणाल्या. केंद्र सरकारने पीएफआय संघटनेकरील बंदी कोणत्या कायद्यानुसार आणली याबाबतचे स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.