नावाला TRP असल्याने फक्त अजित पवारांचेच नाव घेतले जाते, सुप्रिया सुळेंचा दावा

2075
supriya-sule

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे शनिवारी पंढरपूर इथे आल्या होत्या. विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यापत्रकार परिषदेमध्ये त्यांना अजित पवार यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिल्याबद्दल विचारण्यात आलं. यावर उत्तर देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की बँक घोटाळ्यात 50 नावे आहेत पण एकट्या अजितदादांचे नाव घेतले कारण त्यांच्या नावाला टीआरपी आहे.

मोदी सरकार हे ईडी आणि सीबीआयचा गैरवापर करत असल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आहे.  ईडी, सीबीआय, कारखान्यावरील व बँकेतील कर्जाच्या प्रकरणांच्या भीतीने राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाचे नेते भाजप, शिवसेनेत प्रवेश करत असल्याचा दावाही सुप्रिया सुळे यांनी केला आहे. पक्ष सोडून जाणाऱ्यांपैकी एकाही नेत्याने शरद पवार किंवा राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली नसल्याचंही सुप्रिया यांचं म्हणणं आहे.

देशात व राज्यात मंदीची लाट आहे. अनेक कंपन्या बंद पडत असून कामगारांवर उपासमारीची पाळी आल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. राज्यात एकीकडे पूरपरिस्थिती तर दुसरीकडे दुष्काळ असून या प्रश्नावर सरकार गंभीर नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या