कायदा सुव्यवस्थेचा धाक या राज्यात आहे की नाही? सुप्रिया सुळे यांचा सवाल

supriya-sule

नागपूर येथे एका महिलेने ओव्हरटेक केले म्हणून एका व्यक्तीने तिला भररस्त्यात मारहाण केली आहे. या लाजीरवाण्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणाचा व्हिडीओ सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या सोशल मीडियावर शेअर करत सदर व्यक्तीवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच कायदा सुव्यवस्थेचा धाक या राज्यात आहे की नाही? असा सवालही केला आहे.


”राज्याच्या गृहमंत्र्यांच्या शहरात महिलेला भरचौकात मारहाण करण्यापर्यंत मजल जाते. कायदा सुव्यवस्थेचा धाक या राज्यात आहे की नाही? या राज्यात महिला सुरक्षित आहे का ? या प्रकरणाचा कसून तपास होऊन या व्यक्तीला कठोर शासन झालेच पाहिजे.” असे ट्विट सुप्रिया सुळे यांनी केले आहे.