मला मोदींची काळजी वाटते!

supriya-sule

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी टीका केली आहे. पंतप्रधानांची मलाकाळजी वाटते असं म्हणताना त्या म्हणाल्या की, ‘नरेंद्र मोदी हे पंतप्रधान आहेत. त्यांचं महाराष्ट्रात स्वागतच आहे. पण मला मोदींची काळजी वाटते , कारण ग्रामपंचायत निवडणूक असो की लोकसभेची निवडणूक मोदींनाच पळावं लागतं. भाजपकडे मोदींशिवाय दुसरा पर्याय नाही.

सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले की पूर्वी भाजपकडे मोठी फळी होती, आता ती दिसत नाही. त्यामुळे कोणतीही निवडणूक आली की मोदी यांनाच सगळीकडे पळावे लागते. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना त्या म्हणाल्या की आमच्या कुटुंबावर बोलल्याशिवाय बातमी होत नाही, त्यामुळे आमच्यावर बोलून कुणाची प्रसिध्दी होत असेल तर होऊ द्या. अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार याने गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेतली होती. या भेटीवरून पडळकर यांनी टीका केली होती.