वीज बिल माफीवरून आता यू टर्न घेऊ नका, जुना व्हिडीओ ट्विट करत सुप्रिया सुळे यांचा फडणवीसांना टोला

supriya-sule

महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱयांचे वीज बिल माफ करण्याची मागणी केली होती. तेच फडणवीस आता शेतकऱयांनी वीज बिल भरले पाहिजे असे म्हणत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी फडणवीसांचे हे दोन्ही व्हिडीओ ट्विट करत आता यू टर्न घेऊन चालणार नाही असा फडणवीसांना टोला लगावतानाच शेतकऱयांचे वीज बिल माफ केलेच पाहिजे असे म्हटले आहे.

महाविकास आघाडी सरकार सावकाराप्रमाणे शेतकऱयांकडून वीज बिल वसूल करत आहे, अशी टीका करतानाच फडणवीसांनी शेतकऱयांचे वीज बिल माफ करावे असे म्हटले होते. तसेच मध्य प्रदेश सरकारने केलेल्या शेतकऱयांच्या कर्जमाफीचे कौतुकही केले होते. परंतू आज त्यांचे सरकार असताना शेतकऱयांची वीज कापली आहे. त्याबाबत विचारले असता, वीज बिल भरले पाहीजे असे फडणवीसांनी म्हटले आहे. त्याबाबत सुप्रिया सुळे यांनी, आज फडणवीसांनी मध्य प्रदेश पॅटर्न राबवून शेतकऱयांना दिलासा द्यावा असे म्हटले आहे.