जिल्हानियोजन समितीच्या बैठकीत आमदार प्रकाश सोळुंके व सुरेश धस यांच्यात वाद

1805

बीड जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू असलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार सुरेश व आमदार प्रकाश सोळुंके यांच्यात वाद झाला. धस बोलत असताना सोळुंकेंनी त्यांना अडवल्याने धस संतापले अन टोकाची भाषा सुरू झाली वेळीच पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी हस्तक्षेप करत वादावर पडदा टाकला.

बीड जिल्हा नियोजन समितीची पहिलीच बैठक शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. बैठक अंतिम टप्प्यात असताना आमदार सुरेश धस यांनी एक मुद्दा मांडला. त्यावेळी आमदार प्रकाश सोळुंके यांनी त्यांचं मत मांडलं. त्यावर धस संतप्त झाले. प्रकाश दादा या बैठकीत राजकारण आणू नका, तुम्ही नेहमीच सदस्याचा अपमान अन अवमान करत आहात, तुम्ही काही आमच्या पेक्षा जेष्ठ नाही आहात. तुम्ही अन मी एकाच वेळी आमदार झालो आहोत, जिल्हापरिषद सदस्य ही सोबत झालो आहोत फरक एवढाच आहे तुम्ही श्रीमंताच्या घरी जन्माला आला आहात. या शब्दात धस यांनी प्रकाश सोळुंकेना सुनावले.

यावर साळुंके यांनी स्पष्टीकरण देताना, मी कोणाचाही अपमान केला नाही मी नियमाला धरून बोलत आहे, येथे कामाचा विषय बोला असे सांगितले. त्यावेळी पालक मंत्री धनंजय मुंडे यांनी हस्तक्षेप करत धस यांना शांत केले. काय बोलायचे ते आपण जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात बोलू येथे वाद घालू नका असे मुंडे यांनी दोघांनाही सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या