आयपीएल-१० : कोहलीला मागे टाकत रैना अव्वल स्थानी

16

सामना ऑनलाईन । मुंबई

सलग २ सामन्यातील पराभवानंतर सुरेश रैनाच्या ८४ धावांच्या धमाकेदार खेळीच्या जोरावर गुजरात लायन्सने कोलकाता नाईट रायडर्सविरोधात सहज विजय मिळवला. या विजयाबरोबरच गुजरात लायन्सचा कर्णधार सुरेश रैनाने विराट कोहलीला मागे टाकत सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड आपल्या नावे केला.

कोलकाता नाईटरायडरविरुद्ध केलेल्या ८४ धावांसोबतच रैनाने आपीएलमध्ये ४३४१ धावाही पूर्ण केल्या आहेत. त्याने १५३ सामन्यात या धावा केल्या आहेत. याआधी हा रेकॉर्ड विराट कोहलीच्या नावे होता. विराटच्या १४२ सामन्यात ४२६४ धावा आहेत. त्यामुळे सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड रैना किती काळ आपल्या नावे ठेवतो हे पाहावं लागेल. कोलकाता नाईटरायडरविरोधातील विजयानंतर गुजरात लायन्स पॉईंट टेबलमध्ये सातव्या स्थानावर पोहचली आहे. ६ सामन्यात गुजरातला २ विजय तर ४ पराभवांचा सामना करावा लागला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या