सुरंगीच्या फुलांनी कोकणातील आसमंत दरवळला

169

सामना ऑनलाईन,संगमेश्वर

एखाद्या समारंभासाठी जायचं म्हणजे भरजरी साडी बरोबरच सुंदर गजरा माळणं हे ओघानं आलंच . स्त्रीयांना गजऱ्याची आवड आणि ओढ साडी एवढीच असते . मोगरा , चमेली , अबोली , मधुमालती , बकुळ आदी सुगंधी फुलांचे गजरे माळण्याचा मोह टाळता येणं शक्यच नाही. या फुलांच्या यादीमध्ये सुरंगीच्याही फुलांचं नाव घेतलं पाहीजे. सध्या तळ कोकणात या सुरंगीच्या फुलांच्या सुगंधाने  आसमंत दरवळून गेला आहे

सुरंगीच्या फुलांचे वैशिष्ट्य म्हणजे , ती खोडावर फुलतात.  या फुलांचा सुगंध बऱ्याच अंतरावरूनही येतो, त्यामुळे सुरंगीची फुलं फुलली आहे हे सहजपणे कळतं. कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरंगीचे वृक्ष मोठ्या प्रमाणावर आहेत . या फुलांचे वळेसर म्हणजेच गजरे करुन ते विक्रीसाठी बाजारपेठेत आणले जातात. या गजऱ्यांमुळे स्थानिक महिलांना व्यवसाय उपलब्ध होत असतो . या वळेसरांचं आकर्षण केवळ स्थानिक महिलांनाच नाही तर राज्यातल्या, परराज्यातल्या महिलांनाही आहे. सुरंगीचा गजरा हंगामामध्ये २५ ते ३० रुपयांपर्यंत विकला जातो .

आपली प्रतिक्रिया द्या