IPL 2020 – सूर्य तळपला, थेट विराटला भिडला; दोघांमधील ‘टशन’ कॅमेऱ्यात कैद

बुधवारी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल 2020) स्पर्धेत बलाढ्य मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 5 विकेट्सने पराभव केला. मुंबईचा 12 व्या लढतीतील हा 8 वा विजय आहे. या विजयासह मुंबईने प्ले ऑफ मध्ये झोकात प्रवेश केला.

मुंबईच्या विजयात सूर्यकुमार यादव याने महत्वाचे योगदान दिले. त्याने नाबाद 79 धावा करत संघाला विजय मिळवून दिला. या लढती दरम्यान सूर्यकुमार आणि बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली यांच्यात ‘टशन’ पाहायला मिळाली.

कधी झाला दोघांतील हा ‘सामना’?

मुंबईचा संघ बंगळुरूने विजयासाठी दिलेल्या 165 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना 13 व्या षटकात हा प्रकार घडला. या षटकातील पाचव्या चेंडूवर सूर्यकुमार यादव याने डेल स्टेन याला चौकार मारला. यानंतर शेवटच्या चेंडूवर कव्हरच्या दिशेने खेळलेला चेंडू विराटने अडवला.

… तर अर्ध्या सिझनपर्यंत ‘टॉप’वर असणारा दिल्लीचा संघ IPL मधून बाहेर होणार, असं आहे गणित

चेंडू पकडल्यावर विराट सूर्यकुमारकडे चालत आला. यावेळी विराट सूर्यकुमारकडे खुन्नसने पाहात असल्याचे दिसले. त्यावर सूर्यकुमारने देखील विराटवरील नजर हटवली नाही आणि त्यानेही त्याला फुल्ल ‘टशन’ दिली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

https://twitter.com/_harshareddy/status/1321500810358845443?s=19

विजयी खेळी

दरम्यान, बंगळुरूने देवदत्त पडीकल याच्या 74 धावांच्या खेळीच्या बळावर 20 षटकात 6 बाद 164 धावा केल्या. मुंबई कडून बुमराह याने 3 बळी घेतले. यानंतर मुंबईने हे आव्हान 5 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले.

मुंबईकडून 165 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सूर्यकुमारने विजयी खेळी केली. त्याने 43 चेंडूत 10 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने नाबाद 79 धावा केल्या.

आपली प्रतिक्रिया द्या