सुषमा स्वराज यांचा ग्लोबल थिंकर्सच्या यादीत समावेश

1977 मध्ये 25 वर्षांच्या वयात त्या हरियाणातील सर्वात तरुण कॅबिनेट मंत्री बनल्या.

 

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

टिवटरवर मदत मागणा-यांच्या मदतीला धावून जाणा-या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचा २०१६ च्या ग्लोबल थिंकर्सच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. परराष्ट्र व्यवहार मॅगझिनने ही यादी तयार केली आहे. या यादीत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन, जर्मन चँसलर अँजेला मार्केल, संयुक्त राष्ट्रांचे महासचिव बान की मून यांसह मान्यवरांचा समावेश आहे.

ग्लोबल थिंकर्सची यादी जाहीर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरुन सुषमा स्वराज यांचे अभिनंदन केले आहे.

परराष्ट्रमंत्रीपदाची सूत्रे हातात घेतल्यापासून स्वराज नागरिकांच्या समस्या सोडवण्यात पुढाकार घेत आहेत. येमेनमधील युध्दात अडकलेल्या हिंदुस्थानी नागरिकांना सुखरुप मायदेशी आणण्यासाठी स्वराज यांनी पुढाकार घेतला होता, आखातातील १० हजार स्थलांतरित मजुरांना त्यांनी सोडवले होते. एका ब्रिटीश दाम्पत्याला सरोगीसीद्वारे झालेल्या मुलीला भेटण्यासाठी स्वराज यांनी पासपोर्ट मिळवून देण्यास मदत केली होती. प्रकृती बरी नसूनही त्यांचे हे परोपकाराचे काम सुरुच आहे. स्वराज यांनी ट्विटर डिप्लोमसीचा प्रकार प्रचलित केल्याबददल परराष्ट्र व्यवहार मँगझिनने त्यांचे अभिनंदन केले आहे.