सुषमा स्वराज यांचा डोनाल्ड ट्रम्प यांना टोला

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

स्वार्थासाठी पॅरिस हवामान करारावर हिंदुस्थानने स्वाक्षरी केलेली नाही, असा टोला परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आज लगावला. विकसित देशांकडून अब्जावधी रुपये मिळविण्यासाठी हिंदुस्थानने पॅरिस करारावर स्वाक्षरी केली, असा खोचक आरोप ट्रम्प यांनी केला. त्याला प्रत्युत्तर देताना सुषमा बोलत होत्या.

त्या पुढे म्हणाल्या, हिंदुस्थानने हव्यासापोटी या करारावर स्वाक्षरी केलेली नाही. आमची बांधिलकी ही पर्यावरणाशी असून ती पाच हजार वर्षांपासूनची आहे. आम्ही निसर्गाची पूजा करतो. ही हिंदुस्थानची नीती आहे. यामुळे मी ट्रम्प यांचा आरोप फेटाळून लावते. पॅरिस हवामान करारातून अमेरिका बाहेर पडली असली तरी अमेरिकेबरोबरच्या संबंधात कोणताही बदल होणार नाही, असेही स्वराज यांनी नमूद केले.

नवीन एच-१ बी व्हिसा नियम हा हिंदुस्थानच्या दृष्टीने चिंतेचा विषय आहे, असेही सुषमा स्वराज यांनी यावेळी सांगितले. आमचे सरकार सत्तेवर आल्यापासून परदेशामध्ये विविध ठिकाणी अडकलेले ८० हजार हिंदुस्थानी नागरिक सुरक्षितपणे हिंदुस्थानात परत आणले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या