एकता कपूरचा पवित्र रिश्ता फंड, मानसिक आरोग्याविषयी करणार जनजागृती

549

बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या निधनाला एक महिना झाला आहे. त्याच्या स्मरणार्थ निर्माती एकता कपूरने ‘पवित्र रिश्ता फंड’ लाँच केला आहे. या निधीतून लोकांमध्ये मानसिक आरोग्यविषयक जनजागृती केली जाणार आहे. झी 5 चे सीईओ तरुण कटियाला यांच्या सहकार्याने एकताने हा उपक्रम सुरू  केलाय.

10 वर्षांपूर्वी सुशांतने एकताच्या ‘पवित्र रिश्ता’ मालिकेत काम केले होते. मालिकेत त्याने मानव ही व्यक्तिरेखा साकारली होती. या भूमिकेने सुशांतने अनेकांची मनं जिंकली, तो लोकप्रियतेच्या शिखरावर पोचला. त्या मालिकेत सुशांत आणि अंकिताची जोडली खूप गाजली होती. त्याच मालिकेच्या नावाने एकता कपूर निधी उभारत आहे. आपल्या नव्या उपक्रमाविषयी एकता सांगते, गेल्या दहा वर्षांत खूप काही बदललंय. लोक ताणतणावात जगत आहेत. कोरोनाच्या संकटात अनेकांचे मानसिक आरोग्य बिघडले आहेत. त्यामुळेच पवित्र रिश्ता फंडच्या माध्यमातून आम्ही अशा मानसिक आजाराशी लढणाऱ्या लोकांना मदत करणार आहोत.

आपली प्रतिक्रिया द्या