सुशांतच्या इमारतीतील सीसीटीव्ही पोलिसांच्या ताब्यात

984

अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी तो राहत असलेल्या इमारतीमधील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी आतापर्यंत 34 जणांचे जबाब नोंदविले आहेत.

सुशांतच्या आत्महत्याप्रकरणी दिग्दर्शक संजय लीला भन्साळीचा वांद्रे पोलिसांनी जबाब नोंदविला. भन्साळी हे सुशांतसोबत चार चित्रपट करण्याचा विचार करीत होते; पण काही कारणामुळे सुशांत चित्रपट करू शकला नाही, अशी माहिती तपासात समोर आली आहे. पोलीस सर्व शक्यता पडताळून पाहत आहेत. पोलिसांनी सुशांत राहत असलेल्या इमारतीचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. पण सुशांतच्या घरात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याची माहिती समोर आली आहे.

तेतीन ट्विट कोणाचे?

सुशांतच्या आत्महत्येनंतर त्याच्या नावाने तीन ट्विट केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. पोलीस सुशांतच्या गेल्या सहा महिन्यांतील ट्विटची माहिती गोळा करीत आहेत. त्यावरून काही बाबींचा खुलासा होईल. पोलीस ट्विटरच्या नोडल अधिकाऱ्य़ाची मदत घेणार आहेत. सुशांतच्या नावाने ट्विटरवर कोणी माहिती अपलोड केली? याचा शोध पोलीस घेत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या