सुशांत सिंह प्रकरण – सीबीआय चौकशीला राज्य सरकारचा विरोध, सर्वोच्च न्यायालयात माहिती

1130

अभिनेता सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण सीबीआयकडे देण्याच्या निर्णयाला राज्य सरकारने आज सर्वोच्च न्यायालयात विरोध दर्शवला आहे. सरकारने या प्रकरणाचा तपशील बंद लिफाफ्यातून सर्वोच्च न्यायालयासमोर सादर केला आहे. या प्रकरणाचा तपास बिहार पोलिसांनी करणं हेच बेकायदेशीर असताना बिहार सरकार सीबीआय चौकशीची शिफारस कशी करू शकते, असा खुलासा राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयासमोर केला आहे.

या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र सरकारनं मुंबई पोलिसांकडे दिलेला असतानाच बिहार सरकारनं या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची शिफारस केली होती. त्यानंतर हा तपास सीबीआयकडे देण्यात आला आहे. या प्रकरणाचा बिहार पोलिसांनी तपास करणं हेच बेकायदेशीर असताना बिहार सरकार सीबीआय चौकशीची शिफारस कशी करू शकते, असा सवाल राज्य सरकारने उपस्थित केला.

बिहार पोलिसांना चौकशीचा अधिकार नाही
सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात बिहार सरकारने नियमांच्या विरोधात जाऊन काम केले आहे. बिहार सरकारकडे केवळ झिरो एफआयआर दाखल करून घेण्याचा अधिकार होता. गुन्हा दाखल करून घेतल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र सरकारकडे पाठवायला हवा होता. मात्र, चौकशीचा कोणताही अधिकार नसताना बिहार पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर तपास सुरू केला, असे राज्य सरकारने म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या