सुशांत सिंग राजपूत याने धुडकावली कोट्यवधींची ऑफर

9

सामना ऑनलाईन । मुंबई

एमएस धोनी फेम अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने कोट्यवधींची एक ऑफर नाकारल्याचं वृत्त आहे. फेअरनेस क्रीमच्या जाहिरातीची ही ऑफर नाकारल्यामुळे सुशांत आता या क्रीम्सविरोधात लढणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीत समाविष्ट झाला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या फेअरनेस क्रीमच्या जाहिरातीसाठी सुशांतला १५ कोटी देण्यात येणार होते. मात्र, अशा प्रकारे चुकीच्या गोष्टींचं समर्थन केल्यास समाजात चुकीचा संदेश जातो या विचाराने त्याने ही ऑफर धुडकावून लावली. २०१६मध्ये अभय देओल याने फेअरनेस क्रीम्सची जाहिरात करणाऱ्या बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींविरोधात टीका केली होती. त्यानंतर यावर सेलिब्रिटींचं ट्विटर वॉर रंगलेलं पाहायला मिळालं होतं.

सध्या सुशांत ड्राइव्ह आणि चंदामामा दूर या आपल्या आगामी चित्रपटांच्या चित्रीकरणात व्यग्र असून तो सारा अली खानसोबत केदारनाथ या चित्रपटातही दिसणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या