रियाने सुशांतवर काळी जादू केली होती, कुटुंबाचा गंभीर आरोप

सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्ती विरोधात दररोज नवनवे आरोप समोर येत आहेत. सुशांतचे पैसे लुटल्याचा त्याचा मानसिक छळ केल्याच्या आरोपांनंतर आता सुशांतच्या कुटुंबीयांनी रिया काळी जादू करत असल्याचा आरोप केला आहे. सुशांतची बहिण मीतू हिने हा आरोप केला आहे. सुशांतच्या घरात काम करणाऱ्याने तिला ही माहिती दिल्याचे तिचे म्हणने आहे. मीतूने पाटणा पोलिसांना दिलेल्या जबाबात हा आरोप केला आहे.

रिया चक्रवर्ती ‘विषकन्या’, सुशांतच्या हत्येची तिला सुपारी मिळाली होती!

सुशांतचे वडिल कृष्णा किशोर राजपूत यांनी देखील रियाने सुशांतला त्याच्या घरात भुताटकी असल्याचे सांगून प्रचंड घाबरवले होते. तेव्हापासूनच त्याची मानसिक स्थिती खराब झाल्याचा आऱोप केला होता. त्यानंतर आता घरातील नोकराने देखील या गोष्टीला दुजोरा दिला आहे. ‘रिया सुशांतवर काळी जादू करायची. त्याच्या खात्यातून बऱ्याचदा पंडितांना व धार्मिक विधीच्या सामानासाठी पैसे काढले गेले आहेत. सुशांतच्या घरात अनेकदा धार्मिक विधीच्या नावाखाली काळ्या जादूंच्या विधी केल्या जायच्या. या सर्व रिया करायची’ असे मीतून पोलिसांना सांगितले आहे.

अभिनेता सुशांत सिंग राजपूतने 14 जून रोजी त्याच्या वांद्रे येथील घरी गळफास घेत आत्महत्या केली होती. त्यानंतर बॉलिवूडमधील नेपोटिझमवरून बराच वाद झाला. मात्र आता सुशांतच्या आत्महत्येच्या तपासाचा पूर्ण रोख त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीकडे वळला आहे. सुशांतच्या वडिलांनी रियाविरोधात पाटणा पोलीस ठाण्यात गंभीर आरोप करत तक्रार दाखल केली आहे. तेव्हापासून रिया बेपत्ता असून तिने चौकशीला सामोरे जावे असे आवाहन पोलिसांकडून करूनही ती अद्याप समोर आलेली नाही.

आपली प्रतिक्रिया द्या