सुशांतच्या आत्महत्येवरून होणाऱ्या आरोपांना कंटाळून करण जोहरने घेतला मोठा निर्णय

26956

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर नेपोटीझमच्या मुद्द्यावरून ट्रोलर्सच्या निशाण्यावर आलेल्या निर्माता करण जोहर याने मोठा निर्णय घेतला आहे. करण जोहर याने ‘मुंबई एकेडमी ऑफ मूविंग इमेज’ (मामी) च्या सदस्यत्वाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने त्याची समजूत काढण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.

सुशांतच्या आत्महत्येनंतर होत असलेल्या आरोपांना कंटाळून करण जोहरने मामी फिल्मच्या संचालक स्मृती किरण यांना आपला राजीनामा ईमेल केला. फिल्म फेस्टिव्हलचे इतर सदस्य आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने करण जोहर याची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र ते अपयशी ठरले.

दिवंगत अभिनेत्याच्या पत्नीने केली शाहरुख आणि करण जोहरची पोलखोल, सांगितला ‘तो’ किस्सा

बॉलिवूड सेलेब्रिटिंशी नाराजी
काही वेबसाईटने करण जोहर बॉलिवूड सेलेब्रिटीवर नाराज असल्याचे म्हटले आहे. सुशांतच्या आत्महत्येनंतर करण जोहरवर नेपोटीझमला हातभार लावल्याचा आरोप होत आहे. अशा परिस्थितीत एकही सेलेब्रिटी त्याच्या मागे उभा राहताना दिसत नाही. त्यामुळे तो नाराज असल्याचे वृत्त आहे.

ट्विटरवर अनफॉलो
काही दिवसांपूर्वी करण जोहर याने ट्विटरवर अनेकांना अनफॉलो केले होते. फक्त अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, शाहरुख खान, नरेंद्र मोदी आणि अन्य 4 ऑफिस सहकारऱ्यांना त्याने फॉलो केले आहे. तसेच इन्स्टाग्रामवर कमेंट लॉक केल्या आहेत. कारण सुशांतच्या आत्महत्येनंतर ट्रोलर्सने त्याला खिंडीत गाठले होते.

आपली प्रतिक्रिया द्या