सुशांतच्या दिल बेचारा चित्रपटातील कलाकारांची चौकशी होणार

634

अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्या प्रकरणात दररोज नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. या प्रकरणात बिहारमध्ये तक्रार दाखल झाल्यानंतर बिहार पोलिसांचे एक पथक मुंबईत तपासासाठी आले असून त्यांनी आतापर्यंत सुशांतशी संबंधित काही लोकांची चौकशी केली आहे. आता बिहार पोलीस सुशांतचा शेवटचा चित्रपट असलेल्या दिल बेचारा या चित्रपटाच्या कलाकारांची चौकशी करणार आहेत. यात सुशांतची सह कलाकार असलेली नवोदित अभिनेत्री संजना संघी हिचीही चौकशी होणार आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या निधनानंतर त्याचा ‘दिल बेचारा’ हा चित्रपट ओटीपी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. प्रदर्शनानंतर या चित्रपटाने धम्माल उडवून दिली असून पहिल्या 24 तासात जवळपास 9 कोटी 50 लाख लोकांनी हा चित्रपट पाहिला. ‘मिड डे’च्या एका रिपोर्टनुसार सुशांतच ‘दिल बेचारा’ हा चित्रपट प्रसिद्ध वेब सिरीज ‘गेम ऑफ थ्रोन्स’हुन अधिक लोकांनी पाहिले आहे.

ओटीपी प्लॅटफॉर्म ऐवजी हा चित्रपट चित्रपट गृहांमध्ये प्रदर्शित झाला असता तर पहिल्याच दिवशी जळपास 2 हजार कोटी रुपयांचा विक्रमी गल्ला जमवला असता असा दावा करण्यात आला आहे. सरासरी 100 रुपये तिकीट पकडल्यास 950 कोटी रुपयांचा आणि पीव्हीआर चित्रपट गृहांचे सरासरी तिकीट 208 रुपये पकडल्यास जवळपास 2 हजार कोटींची गल्ला जमवला असता. कोणत्याही हिंदुस्थानी चित्रपटाला एवढा प्रतिसाद पहिल्यांदा मिळाला असता.

सर्वाधिक रेटिंग
‘दिल बेचारा’ या चित्रपटाला आतापर्यंत सर्वाधिक रेटिंग मिळाले आहेत. सुरुवातीपासून याला 10 पैकी 10 रेटिंग मिळत असल्याचे हॉटस्टारने ट्विट करून सांगितले. ‘चाहत्यांचे सर्वाधिक प्रेम मिळालेला हा चित्रपट असून यामुळे या चित्रपटाने सर्वात मोठ्या ओपनिंगचा किताब जिंकला आहे’, असे ट्विट हॉटस्टारने केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या