रिया चक्रवर्ती ‘विषकन्या’, सुशांतच्या हत्येची तिला सुपारी मिळाली होती!

14625

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले असून सुशांतच्या वडिलांनी त्याची प्रेयसी रिया चक्रवर्ती हिच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. यात रिया अडकतात दिसत असून तिचा एक वादग्रस्त व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. आता बिहारचे मंत्री आणि जदयू नेते महेश्वर हजारी तिला थेट ‘विषकन्या’ ठरवून मोकळे झाले आहेत.

महेश्वरी हजारी यांनी रिया चक्रवर्ती हिच्यावर निशाणा साधला असून तिला विषकन्या म्हटले आहे. रिया चक्रवर्ती हिला सुशांतच्या हत्येची सुपारी मिळावी होती. तिने एका सुपारी किलर प्रमाणे काम केले. सुशांतला आधी प्रेमाच्या जाळ्यात अडकवले आणि काम तमाम केले, असा गंभीर आरोप हजारी यांनी केला आहे.मुंबईत देशभरातून अनेक कर्तृत्ववान मुलं-मुली चित्रपट नगरीत कामासाठी जातात. मात्र येथील ‘गँग’ कर्तृत्ववान लोकांच्या विरोधात प्लॅन आखतात आणि याच प्लॅनचा भाग म्हणून रिया चक्रवर्ती हिला सुशांतकडे पाठवण्यात आले होते. रियाने सुशांतच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून जे काही केले ते दुर्भाग्यपूर्ण आहे. यामुळे कोणी कोणावर विश्वास करणार नाही, असे हजारी म्हणाले. तसेच पोलीस सध्या तपास करत असून मी जे बोललो तेच सत्य समोर येईल, असा दावाही त्यांनी केला. यावेळी त्यांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची देखील मागणी केली. ‘दै.भास्कर’ने याबाबत वृत्त दिले आहे.

सुशांतचं कुटुंब रियाविरुद्ध साक्ष देण्यासाठी दबाव टाकतंय, मित्राने केला गंभीर आरोप

बॉलिवूडवर टीकास्त्र
सुशांत सिंह राजपूत याने गेल्या महिन्यात 14 तारखेला गळफास लगावून आत्महत्या केल्याचे समोर आले. मुंबईतील राहत्या घरात त्याचा मृतदेह मिळाला होता. तेव्हापासून बॉलिवूडमध्ये नेपोटीझम, घराणेशाही, गँग यावर लोक सडकून टीका करत असून इंडस्ट्रीमधील कलाकार देखील यावर भरभरून बोलत आहेत. बॉलिवूडमधील काही लोक कर्तृत्ववान कलाकार आणि कळपाबाहेरील लोकांना मोठे होऊ देत नाही, त्यांचे खच्चीकरण करण्यात येते, असा आरोप होत आहे.

आतापर्यंत जवळपास 40 लोकांची चौकशी
दरम्यान, या प्रकरणी मुंबई पोलिसांनी आतापर्यंत जवळपास 40 लोकांची चौकशी केली आहे. यात शेखर कपूर, संजय लीला भन्साळी, त्याचे जवळचे मित्र-मैत्रिणी यांचा समावेश आहे.

आपली प्रतिक्रिया द्या