सुशांतच्या आत्महत्येची सीबीआय चौकशी झाली पाहिजे, प्रसिद्ध अभिनेत्रीची मागणी

591

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येने बॉलिवूडमधील वातावरण ढवळून निघाले आहे. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी त्याचे चाहते करत असताना भाजप खासदार व प्रसिद्ध अभिनेत्री रुपा गांगुली यांनी केली आहे.

रुपा गांगुली यांनी ट्विटरवरून काही प्रश्न विचारत सुशांतच्या आत्महत्येची चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. मी सुशांतची चाहती आहे मला त्याच्या मृत्युवरून काही प्रश्न विचारले आहेत. ‘2024 मध्ये त्याला चंद्रावर जायचे होते, अशी पॉझिटिव्ह व्यक्ती आत्महत्या करू शकते यावर विश्वास ठेवणं कठिण आहे’, ‘सुशांतने खरंच चंद्रावर जागा घेतली होती का?, व्हायरल फोटोमध्ये त्याच्या गळ्यावर जे मार्क होते ते एका दुप्पट्यापेक्षा एखाद्या दोरखंडाने झाले असे नाही का वाटत? सुशांतचे मेडिकल प्रिस्क्रिप्शन व डॉक्युमेट्स त्याच्या बेडजवळ सापडले आहे. कोण आपले मेडिकल डॉक्युमेट्स असे का ठेवेल ?’ असे बरेच प्रश्न विचारले आहेत.


रुपाली गांगुली यांनी सीबीआय चौकशीची मागणी करताना पोस्टमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाही टॅग केलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या