सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण; सीबीआयने तपास मुंबई पोलिसांना द्यावा

492

मुंबई पोलीस सुशांतसिंह राजपूत प्रकरणात योग्यरीतीने निष्पक्ष तपास करत आहेत. त्यामुळे बिहार सरकारच्या सांगण्यावरून याप्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल करण्याची किंवा या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची गरज नाही. सध्याच्या परिस्थितीत सीबीआयने दाखल केलेला एफआयआर ‘झीरो एफआयआर’मध्ये रूपांतरित करून तो मुंबईतील वांद्रे पोलीस स्थानकात हस्तांतरित करावा, अशी भूमिका राज्य सरकारच्या वतीनं सर्वोच्च न्यायालयात मांडण्यात आली आहे. सुशांतसिंह राजपूत प्रकरणी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या सुनावणीआधी राज्य सरकारच्या वतीने कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी आतापर्यंत 56 लोकांचे जबाब नोंदवले असून सुशांतच्या मृत्यूमागची कारणं शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

रिया सुप्रीम कोर्टात मीडियाने भांडवल केलेय!

रिया चक्रवर्तीने सोमवारी सर्वोच्च न्यायालयात नवीन याचिका दाखल केली. मीडियाने सुशांतच्या आत्महत्येला सनसनाटी बातमीचे रूप दिले. माझ्याविषयी चुकीच्या बातम्या देऊन माझ्या अधिकारांवर गदा आणलीय, असा आरोप तिने केला आहे. मीडियाला गेल्या 30 दिवसांत अभिनेता आशुतोष भाकरे आणि समीर शर्मा यांनी केलेल्या आत्महत्या कशा दिसल्या नाहीत, असा सवालही तिने याचिकेत केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या