मृत्यू पूर्वी अभिनेता सुशांत सिंह राजपूतने तीन गोष्टी सर्च केल्या होत्या

3920

मृत्यू पूर्वी अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याने तीन महत्त्वाच्या गोष्टी सर्च केल्या होत्या. त्याच्या मृत्यूनंतर सुरू झालेल्या तपासात ही माहिती समोर आली आहे. मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी ही माहिती दिली आहे. बॉयपोलर डिसऑर्डर, सिजोफ्रेमीया, ‘पेनलेस डेथ’ सर्च करायचा गुगलवर सर्च करत होता अशी माहिती उघड झाली आहे.

जाणकारांच्या माहितीनुसार बॉयपोलर डिसऑर्डर, सिजोफ्रेमीया, हे गंभीर मानसिक आजार आहेत. विशेष म्हणजे सुशांत मानसिक आजारावर गोळ्या घेत होता.

मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी स्पष्ट सांगितले की फ्लॅट सुसाईडच्या दिवशीच सील करण्यात आला होता. 15 जून रोजी फॉरेन्सिक टीम तिथे पोहोचली. तसेच काही डॉक्टर देखील घटनास्थळी दाखल झाले त्यांनंतरच दरवाजाचे सील काढण्यात आले. दिशा सालीयनच्या प्रकरणात त्याचे नाव आल्याने तो डिस्टर्ब होता. सुशांत हा दिशाला एकदाच भेटला होता. या प्रकरणात आपले नाव का गोवले जात आहे असा मेसेज देखील त्याने तिच्या वकिलांना केला होता. 8 जून रोजी रिया चक्रवर्ती सुशांतचं घर सोडून गेली. त्यानंतर त्याची बहीण त्याच्याजवळ होती. मात्र मुलीची परीक्षा असल्याने ती 13 जून रोजी आपल्या घरी गेली.

आयुक्तांनी आणखीही काही माहिती देताना तपासाची दिशाही स्पष्ट केली. मॉडेल रियाचा जबाब 2 वेळा नोंदवण्यात आला, ज्या मधून रिया आणि सुशांतच्या कुटुंबात तणाव होता.

सुशांतच्या थेरपिस्टच्या म्हणण्यानुसार त्याला मानसिक आजार होता. रिया त्याला साथ देत होती. सुशांतचे जिजाजी विशाल कीर्ति यांनी एक ब्लॉग लिहून प्रश्न उपस्थित केले होते.

आपली प्रतिक्रिया द्या