सुशांतच्या आत्महत्येमागे ‘डी’ गँगचा हात, ‘रॉ’च्या माजी अधिकाऱ्याने केलेल्या दाव्यांमुळे खळबळ

2387

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येचे प्रकरण रोज वेगळे वळण घेत आहे. या प्रकरणी रोज कोणाची न कोणाची चौकशी सुरू आहे. आजपर्यंत जवळपास 15 ते 16 जणांची चौकशी करण्यात आली आहे. अनेकांनी हा नेपोटीझमचा बळी असल्याचे म्हणत सीबीआय चौकशीची मागणी केली. आता माजी ‘रॉ’ अधिकारी एन. के. सूद यांनी याबाबत धक्कादायक दावा केला आहे.

स्वतःला माजी ‘रॉ’ अधिकारी सांगणारे एन. के. सूद यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यात सूद यांनी सुशांतच्या आत्महत्येमागे ‘डी’ गँगचा हात असल्याचा दावा केल्याने खळबळ उडाली. 11 मिनिटांचा हा व्हिडीओ असून यात त्यांनी अनेक कंगोर उघड करण्याचा प्रयत्न केला आहे. सुशांत याने आत्महत्या केली नसून त्याची हत्या झाली व यात दाऊद इब्राहिमचा हात असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

दाऊद इब्राहिम याची माणस सुशांतला फोनवर धमकी देत होते आणि याचमुळे तो तणावात होता, असा दावा सूद यांनी केला आहे. तसेच यात सुशांतच्या जवळचे काही लोक सहभागी असल्याचे सूद यांनी म्हटले. यामुळे त्याने 50 वेळा सिमकार्ड बदलले होते, असेही त्यांनी म्हटले. तसेच सुशांत याच्या मृत्यूच्या एक दिवस आधी (13 जून) त्याच्या घराबाहेरचा सीसीटीव्ही कॅमेरा बंद करण्यात आला होता. या एक प्लॅनचा भाग होता आणि हत्येकडे इशारा करतो असे त्यांनी म्हटले.

आपली प्रतिक्रिया द्या