सुशांत अंकिता लोखंडेच्या घराचे हफ्ते भरत होता ?

1858

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात ईडीकडून सुरू असलेल्या तपासात काही धक्कादायक माहिती समोर आली आहे. सुशांत सिंह राजपूत हा त्याची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे राहत असलेल्या घराचे देखील हफ्ते भरत होता अशी माहिती ईडीच्या सूत्रांनी दिली आहे. इंडिया टुडेने ईडीच्या सूत्रांच्या हवाल्याने याबाबत माहिती दिली आहे. दरम्यान अंकिताने मात्र हे आरोप खोटे असल्याचे सांगत तिच्या घराचा हफ्ता तिच भरत असल्याचे सांगितले आहे. तिने सोबत तिचे बँकचे स्टेटमेंट देखील जोडले आहेत.

सुशांत सिंह राजपूतच्या खात्यातून 15 कोटी रुपयांची अफरातफर झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केल्यानंतर या प्रकरणात इडी तपास करत आहे. ईडीने सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक यांची चौकशी केली. रियाने ईडीला दिलेल्या माहितीनसार, सुशांत अंकिताच्या घराचे हफ्ते भरत असून ते वेगळे झाल्यानंतरही तो ते हफ्ते भरत आहे. अंकिताला ते घर रिकामं कर असं कसं सांगावं हा प्रश्न सुशांतला पडला होता’

अंकिता लोखंडे मालाड येथे एका मोठ्या फ्लॅटमध्ये राहते. या फ्लॅटची किंमत 4.5 कोटी असल्याचे समजते. दरम्यान अंकिताने ती स्वत: या घराचे हफ्ते भरत आहे. अंकिताने इंस्टाग्रामवरून तिच्या बँकेचे डिटेल्स शेअर केले आहेत. त्यात तिने 72 हजार व 23 हजार असे दोन ट्रान्झॅक्शन अधोरेखित केले आहेत. तिने घराचे कागदपत्रही त्यासोबत जोडले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या