हॉटेलमधील ‘ते’ भयानक चित्र पाहिल्यानंतर सुशांतची मानसिक स्थिती बिघडली, रियाचा धक्कादायक दावा

3312

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात दररोज नवनवीन माहिती समोर येत आहेत. सुशांतच्या मानसिक आजाराबाबत नुकताच त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीने धक्कादायक खुलासा केला आहे. इटलीमध्ये एक चित्र पाहिल्यानंतर सुशांतची मानसिक स्थिती बिघडल्याचा दावा रियाने केला आहे. रियाने ईडीच्या चौकशीदरम्यान ही माहिती दिली आहे.

रिया चक्रवर्ती ‘विषकन्या’, सुशांतच्या हत्येची तिला सुपारी मिळाली होती!

रिया व सुशांत गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात युरोप टूरवर गेले होते. ‘ आम्ही इटली मध्ये ज्या हॉटेलमध्ये थांबलो होतो. तिथे जगभरातील प्रसिद्ध चित्रं लावली होती. आमच्या खोलीत फ्रान्सिस्को गोया यांचे ‘सॅटर्न डव्होरिंग हिज सन’ हे चित्र लावले होते. ते चित्र पाहिल्यानंतर सुशांतला जबरदस्त मानसिक धक्का बसला होता. तो पूर्णपणे हादरला होता. त्याने रुद्राक्षाची माळ घेऊन जप सुरू केला. त्यानंतर आम्ही तिथून ऑस्ट्रियाला गेलो. मात्र सुशांतची मानसिक स्थिती ठिक नसल्याने आम्ही आमचा दौरा अर्धवट सोडून परत आलो. कारण तो सतत काही ना काही कारणाने रडायला लागायचा. त्यानंतरही आम्ही एकत्र राहत होता. त्याचे मानसोपचातज्ज्ञांकडून उपचारही सुरू होते’, असे रियाने ईडीला सांगितल्याचे समजते. टाईम्स ऑफ इंडियाने त्यांच्या सूत्राच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.

रोखठोक- एक सुशांत; बाकी अशांत! एका आत्महत्येचे राजकारण!

सुशांत सिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी अंमलबजावणी संचलनालयातर्फे (ईडी) रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती, सुशांतची मॅनेजर श्रुती मोदी, सुशांतची बहिण यांची चौकशी करण्यात आली आहे. सुशांतची मॅनेजर श्रुती मोदीने चौकशीदरम्यान सुशांतचे सर्व निर्णय रियाच घ्यायची असे सांगितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या