‘लालू फोन करून एनडीएचे आमदार फोडण्याचा प्रयत्न करत आहे’ – सुशील मोदी

भाजप नेते आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी लालू प्रसाद यादव यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. लालू यादव हे एनडीएच्या आमदार फोन करून फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले आहेत. तसेच ते एनडीए आमदारांना मंत्री बनवण्याचीही ऑफर करत असल्याचे मोदी म्हणाले आहेत.

सुशील मोदी यांनी ट्विट करून लालू प्रसाद यादव यांना लक्ष्य केलं आहे. ट्विटमध्ये त्यांनी मोबाइल नंबरचा उल्लेखही केला आहे. त्यांनी दावा केला आहे की, लालू त्या मोबाईल नंबरहुन एनडीएच्या आमदारांना फोन करत आहेत.

सुशील मोदी यांनी असा ही दावा केला आहे की, आमदारांना ज्या मोबाईल नंबरहुन फोन आला होता, त्याची सत्यता पडताळण्यासाठी त्यानी स्वतःही त्या नंबरवर फोन केला होता. फोन केल्यावर त्यांचं लालू यादव यांच्याशी बोलणं झालं. फोनवर लालू यादव यांच्याशी बोलताना त्यांनी लालू यांना, ‘असा चुकीचा प्रकार करू नका. तुम्ही तुरुंगात बंद आहात. आमदारांना फोडण्याचा प्रकार चुकीचा आहे. आमदार फोडणीमध्ये तुम्हाला यश येणार नाही’, असं ते लालू यांना बोलले असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या