सुषमा स्वराज, अरुण जेटली यांच्यासह सात जणांना पद्म विभूषण पुरस्कार

806

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशातील मानाचे नागरी सन्मान असलेल्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. माजी केंद्रीय मंत्री जॉर्ज फर्नांडीस, अरुण जेटली, सुषमा स्वराज, विश्वेशतीर्थ स्वामीजी यांना मरणोत्तर पद्म विभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. यांच्याव्यतिरिक्त जगप्रसिद्ध बॉक्सिंगपटू मेरी कोम, गायक पंडीत छन्नूलाल मिश्रा, मॉरिशियसचे हिंदुस्थानी वंशाचे माजी पंतप्रधान अनिरुद्ध जगन्नाथ यांना देखील पद्मविभूषण जाहीर झाला आहे.

माजी संरक्षण मंत्री व गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनाही मरणोत्तर पद्म भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. आनंद महिंद्रा, पीवी सिंधु यांच्यासह राष्ट्रपतींकडून 16 जणांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत तर 118जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले.

आपली प्रतिक्रिया द्या