मुलाच्या अकाली निधनाने आई अडचणीत, सुषमाताईंच्या एका ट्विटने दूर केली समस्या

18

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

सिंगापूरमधील कुआलालंपूर विमानतळावर मुलाच्या मृतदेहासोबत अडकलेल्या एका हिंदुस्थानी महिलेला परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी तत्काळ मदत पोहोचवली आहे. स्वराज यांनी या महिलेच्या मुलाच्या मृतदेहाला हिंदुस्थानात आणण्याची व्यवस्था व संपूर्ण खर्च करण्याचे आदेश सिंगापूरमधील हिंदुस्थानी दूतावासाला दिले आहेत. एका ट्विटर युजरने याबाबत सुषमा स्वराज यांना ट्विट केल्यानंतर त्यांनी तत्काळ त्या महिलेपर्यंत मदत पोहचवली आहे.

सदर महिला तिच्या तरूण मुलासोबत मुलासोबत ऑस्ट्रेलियाहून हिंदुस्थानात परतत होती. त्यावेळी कुआलालंपूरला विमान बदलताना तिचा मुलगा अचानक चक्कर येऊन पडला. त्यानंतर डॉक्टरांनी तपासले असता त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मृत तरूणाच्या रमेश नावाच्या मित्राने ट्विटरवरून सुषमा स्वराज यांना ट्विट करून त्यांच्याकडे मदत मागितली. त्यानंतर काही वेळातच स्वराज यांनी सिंगापूरमधील हिंदुस्थानच्या दूतावासाशी संपर्क साधून त्यांना त्या महिलेला मदत करण्याचे आदेश दिले. तसेच त्या तरूणाचा मृतदेह हिंदुस्थानात आणण्यासाठी येणारा खर्च देखील दूतावासालाच करण्याचे आदेश दिले. सुषमा स्वराज यांनी ट्विट करून याबाबत सांगितले आहे. ‘हिंदुस्थानी दूतावासातील अधिकारी त्या महिलेला व तिच्या मुलाच्या शवाला घेऊन लवकरच मलेशियावरून चेन्नईला येणार आहेत. शोकाकूल परिवाराच्या दुखात आम्ही सहभागी आहोत.’ असे ट्विट स्वराज यांनी केले आहे.

सुषमा स्वराज या ट्विटरवर सक्रीय असून त्या कायम परदेशात अडकलेल्या हिंदुस्थानी नागरिकांना मदत करत असतात. गेल्याच रविवारी नायजेरियात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तीन हिंदुस्थानी नागरिकांनी स्वराज यांच्याकडे ट्विटरवरून मदत मागितली होती. त्यानंतर स्वराज यांनी नायजेरियातील दूतावासाला या तीन्ही नागरिकांच्या सुटका करण्याचे आदेश दिले होते.

आपली प्रतिक्रिया द्या