पंजाबमध्ये आयएसआय एजंटला पकडले

सामना ऑनलाईन । बटाला

पाकिस्तानची गुप्तचर संघटना ‘आयएसआय’साठी काम केल्याच्या संशयावरुन गुरुमुख सिंह याला पंजाब पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुरियान खूराद गावाजवळ सापळा रचून गुरुमुख सिंह याला पकडण्यात आले. सध्या त्याची चौकशी सुरू आहे. पंजाब पोलीस आणि लष्करी यंत्रणा या प्रकरणाचा तपास करत आहे.

गुरुमुख सिंह हा हिंदुस्थानचा नागरिक आहे. लष्कराशी संबंधित महत्त्वाची माहिती तो पाकिस्तानला पुरवत होता, असा संशय पंजाब पोलिसांनी व्यक्त केला आहे. गुरुमुख कट्टर विचारांच्या शीख समुहाबरोबर पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेला होता. तिथेच तो आयएसआयच्या संपर्कात आला असल्याचा आरोप पंजाब पोलीस करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या