ISIS च्या दहशतवाद्याला ‘जय श्री राम’ चा जयघोष करायला लावला, बेदम धुलाई केल्याचाही आरोप

हिंदुस्थानात साखळी स्फोट घडवण्याचा आणि आत्मघाती हल्ले करण्याचा कट रचल्याप्रकरणी राशिद अफसर याला अटक करण्यात आली आहे. राशिद हा ISIS चा दहशतवादी असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. 2018 साली त्याला अटक करण्यात आली होती आणि तिहार तुरुंगात ठेवण्यात आलं आहे. या राशिदने आरोप केला आहे की त्याला तुरुंगातील अन्य कैद्यांनी ‘जय श्री राम’ चा जयघोष करायला लावला. या प्रकरणी त्याने दिल्लीतील स्थानिक न्यायालयातही धाव घेतली असल्याचं कळालं आहे.

राशिद जफर हा देशातील महत्वाचे नेते यांना ठार मारण्याचा आणि उत्तरेकडच्या काही प्रमुख सरकारी संस्थांमध्ये घातपात घडवण्याचा कट रचत होता असं पोलिसांनी सांगितलं आहे. घातपाती कृत्य करण्याच्या आधीच त्याला अटक करण्यात आली होती. या राशिदने दिल्लीतील न्यायालयात एम.एस खान नावाच्या वकिलांमार्फत याचिका दाखल केली आहे. यात त्याने आरोप केला आहे की तुरुंगातील इतर कैद्यांनी मिळून त्याची जाम धुलाई केली आणि ‘जय श्रीराम’ म्हणायला लावलं. हा प्रकार झाल्यानंतर आपण वडिलांना फोनवरून सगळी घटना सांगितली होती असंही त्याने म्हटलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या