विधानसभेतील १९ निलंबित आमदारांपैकी ९ जणांचे निलंबन मागे

सामना ऑनलाईन । मुंबई

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विधानसभेत गदारोळ घातल्याप्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या १९ आमदारांपैकी ९ जणांचे निलंबन मागे घेण्यात आले आहे. संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी ही माहिती दिली.संग्राम थोपटे, दीपक चव्हाण, दत्तात्रेय भरणे, अवधूत तटकरे, अमित झनक, वैभव पिचड, अब्दुल सत्तार, डी. पी. सावंत, नरहरी झिरवळ अशी निलंबन मागे घेतलेल्या आमदारांची नावे आहेत.

आमदारांचे निलंबन मागे घ्यावे अशी मागणी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी केली होती. अखेर राज्य सरकारने सकारात्मक निर्णय घेण्याचे संकेत दिले आणि ९ जणांचे निलंबन मागे घेतल्याची घोषणा केली. अद्याप १० आमदारांचे निलंबन कायम आहे.

राज्य सरकारने १९ आमदारांचे निलंबन केल्यानंतर बहुमताच्या जोरावर अर्थसंकल्प मंजुर करुन घेतला. या घटनेनंतर विरोधकांनी संघर्ष यात्रा सुरू करुन राज्य सरकारला आव्हान दिले. अखेर सरकारने नऊ आमदारांचे निलंबन मागे घेतल्याची

आपली प्रतिक्रिया द्या