नवऱ्याकडून चारित्र्यावर संशय, नवविवाहितेची आत्महत्या

लग्नानंतर अवघ्या सहा महिन्यात पतीकडून पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेण्यास सुरूवात झाली. त्यामुळे शारिरीक व मानसिक छळास कंटाळून नवविवाहितीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना 9 सप्टेंबरला औंधमधील ट्वीन टॉवर वेस्टर्न मॉलमागे घडली. मालविका भादुरी (वय 32 रा. औंध ) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी त्यांची आई नीना कुलूर (59) यांनी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मालविकाचे मार्च 2021 मध्ये लग्न झाले होते. लग्नानंतर ती सासरी नांदत असताना नवऱ्याने तिच्या चारित्र्यावर संशय घेण्यास सुरूवात केली. तिला शिवीगाळ करून शारिरीक व मानसिक छळ केला. त्यामुळे सततच्या छळास कंटाळून मालविकाने 9 सप्टेंबरला गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक संदीप पवार तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या