शनिशिंगणापूरच्या मंदिरात संशयास्पद वस्तू

40

सामना ऑनलाईन । शनिशिंगणापूर

शनिशिंगणापूर येथे मंदिराच्या आवारात एका गोणीत संशयास्पद वस्तू आढळली आहे. त्यामुळे दर्शन बंद करून परिसर निर्मनुष्य करण्यात आला असून शिर्डी येथील बॉम्ब शोधक पथकाला बोलावण्यात आले आहे. आवारातील रथाजवळ एका गोणीत भंगार साहित्याप्रमाणे काही तरी वस्तू भरल्याचे दिसून येत असून त्यात एक दिवा चमकत असल्यामुळे संशय वाढला आहे.

संध्याकाळी ६ वाजता सुरक्षा रक्षकांना संशयास्पद वस्तू आढळली. नंतर पोलिसांना कळविण्यात आले. दर्शन बंद केल्याने बाहेर भाविकांची गर्दी आहे. अनेकांनी बाहेरूनच दर्शन घेऊन परतीचा मार्ग धरला आहे. पोलिसांनी संपूर्ण परिसर सील केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या