‘सुकिश’ चालले हनिमूनला

सामना ऑनलाईन । मुंबई

‘बिग बॉस ९’ मुळे प्रसिद्धीस आलेले सेलिब्रिटी कपल सुयश राय आणि किश्वर मर्चंट (सुकिश) हे त्यांच्या बिझी शेडय़ुलमुळे लग्नाच्या तब्बल दिड महिन्यानंतर हनिमूनला निघाले आहेत. सुकिश हे २६ जानेवारीला हनिमूनसाठी अमेरिकेला जाणार आहेत. मात्र सुयशच्या आगामी मालिकेच्या डेट्समुळे हनिमूनदौराही त्यांना अवघ्या आठ दिवसात आटोपता घ्यावा लागणार आहे.
‘माझ्याकडे अमेरिकेचा दहा वर्षाचा व्हिसा आहे. पण आतापर्यंत मी अमेरिकेला एकदाही गेलेले नाही. आता तो व्हिसा संपत देखील आला आहे. त्यामुळेच आम्ही हनिमूनला अमेरिकेलाच जायचे ठरवले. अमेरिकत आम्ही लॉस एंजलिस, लास वेगास, सॅन डिऍगो, सॅन फ्रान्सिस्को या शहरांना भेट देणार आहोत. तिथेच तीन फेब्रुवारीला माझा वाढदिवस साजरा करणार. सुयशने नुकतेच त्याच्या ‘एक था राजा एक थी राणी या मालिकेच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. त्यामुळे आम्ही ४ फेब्रुवारीला परत येण्यासाठी निघू.’ असे किश्वरने प्रसारमाध्यमांना सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या