मुंबई वाहतूक पोलिसांच्या ताफ्यात नव्या मोटारसायकली

मुंबई वाहतूक पोलिसांच्या ताफ्यात 10 नव्या मोटरसायकली दाखल झाल्या आहेत. सुझिकी कंपनीने या मोटारसायकली मुंबई वाहतूक पोलिसांना दिल्या आहेत.

पूर्वी मुंबई पोलीस हे गस्त करण्यासाठी घोडे आणि घोडागाडीचा वापर करायचे. कालांतराने गुन्हेगारांना धरपकड करण्यासाठी मुंबई पोलिसांना दळणवळणाच्या साधनांची गरज भासू लागली. आज मुंबई पोलीसाच्या ताफ्यात मोटारसायकल, बुलेट प्रूफ वाहन ते कमांड पोस्ट अशा प्रकारची सुमारे 4 हजार 753 वाहने आहेत.

मुंबई पोलीस दलातील वाहतूक विभाग हा महत्काचा घटक आहे. शहरातील वाहतुकीला शिस्त लावणे, बेशिस्त चालकावर कारवाई करणे, वाहन अपघात, नैसर्गिक दुर्घटना घडल्यावर त्या परिसरातील वाहतुक कोंडी होऊ नयेत याची खबरदारी वाहतूक पोलीस घेतात. वाहतूक पोलिसांसाठी सुझिकी कंपनीने खास 10 नव्या मोटारसायकली सह पोलीस आयुक्त (वाहतूक) मधुकर पांडेय यांच्याकडे सुपूर्द केल्या आहेत. नव्या मोटारसायकली या सहार, वाकोला, बीकेसी, वांद्रे, माहीम, दादर, वरळी, ताडदेव, मलबार हिल,विक्रोळी वाहतूक विभागाला देण्यात आल्या आहे. या अत्याधुनिक मोटारसायकली मुळे वाहतूक सुरळीत होण्यास तात्काळ मदत होईल असे अतिरिक्त आयुक्त (वाहतूक) प्रवीण पडवळ यांनी सांगितले.

अशी आहे नवीन मोटरसायकल
– मोटारसायकलच्या पुढील बाजूस माईक आहे. पीए सिस्टमच्या माध्यमातून वाहतूक पोलीस (रायडर) वाहतुकीबाबतच्या सूचना देईल.
– मोटार सायकलला 3 प्रकारचे सायरन आहेत.
– पोलिस वाहनावर असणाऱया लाईट्सचा वापर सिग्नल लाईट्ससाठी करण्यात आला आहे.
– मागील बाजूस प्रथमोपचार पेटीची सुविधा असेल.

आपली प्रतिक्रिया द्या