चीन-पाकिस्तानसोबत युद्ध करायची तारीख मोदींनी फिक्स केलीय, भाजप नेत्याचे खळबळजनक विधान

modi-shah

लडाख सीमेवर चीनसोबत हिंदुस्थानची सध्या तणावाची स्थिती आहे. तसेच याचा फायदा उठवण्याची पाकिस्तानने देखील एलएसीवर काड्या करायला सुरुवात केली आहे. अशातच सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे नेते आणि उत्तर प्रदेश भाजपचे अध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून यामुळे खळबळ उडाली आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये स्वतंत्र देव सिंह यांनी चीन -पाकिस्तान सोबत युद्धाची वेळ पंतप्रधान मोदींनी ठरवली आहे, असे म्हणताना दिसत आहे. राम मंदिर आणि कलम 370 वरील निर्णया प्रमाणे चीन आणि पाकिस्तानशी युद्ध कधी होणार याबाबत हे मोदींनी ठरवले आहे, असे स्वयंत्र देव म्हणतात. सीमेवर तणावाची स्थिती असताना एका जबाबदार नेत्याने असे विधान केल्याने खळबळ उडाली आहे.

अयोध्या-जम्मू कश्मीरचा दिला दाखला

बलिया जिल्ह्यातील सिकंदरपूर येथे भाजप आमदार संजय यादव यांच्या घरी 23 ऑक्टोबरला पक्षातील कार्यकर्त्यांना संबोधित करताना स्वतंत्र देव सिंह यांनी हे विधान केले आहे. यासाठी त्यांनी अयोध्येत निर्माणकार्य सुरू होणाऱ्या प्रभू श्रीराम मंदिराचा आणि जम्मू-कश्मीरला विशेषाधिकार देणाऱ्या कलम 370 रद्द करण्याचा निर्णयाचा दाखला दिला आहे. याप्रमाणे चीन-पाकिस्तानशी युद्धाची वेळ देखील ठरलेली आहे, असे ते म्हणतात.

swatantra-dev-singh

काँग्रेसची तुलना दहशतवाद्यांशी

दरम्यान, याच व्हिडीओत स्वतंत्र देव सिंह यांनी काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाची तुलना दहशतवाद्यांशी केली आहे. याबाबत खासदार रवींद्र कुशवाह यांना विचारले असता त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये जोश यावा म्हणून असे विधान केल्याचे म्हटले.

आपली प्रतिक्रिया द्या