स्वातंत्र्यवीर सावरकरांना ‘भारतरत्न’ देण्यावरून काँग्रेस आणि डाव्यांना पोटशूळ

374

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना ‘भारतरत्न’ देण्याचा संकल्प भाजपने केल्यानंतर काँग्रेस आणि डाव्यांना पोटशूळ उठला आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी काँग्रेसचा सावरकरांना विरोध नसल्याचे सांगत इंदिरा गांधी यांनी सावरकरांवरील पोस्ट तिकिटाचे अनावरण केले होते याचा दाखला दिला. मात्र सावरकरांच्या हिंदुत्ववादी मुद्दय़ांना काँग्रेसचा आक्षेप असल्याचे ते म्हणाले.

काँग्रेस सावरकरविरोधी नाही. त्यांच्याबद्दल आदर आहे. मात्र त्यांच्या हिंदुत्वाच्या विचारधारेचे काँग्रेस कधीही समर्थन करणार नाही. ‘भारतरत्न’ कुणाला द्यायचे याचा निर्णय केंद्र सरकारने घ्यावा. ते काम एका समितीमार्फत होते.- मनमोहन सिंग

सावरकरांना आम्ही नेते मानतच नाही. त्यांना ‘भारतरत्न’ देणे म्हणजे या देशासाठी बलिदान दिलेल्या शहीद भगतसिंग यांचा अपमान ठरेल- कन्हैयाकुमार, कम्युनिस्ट पक्ष

भाजपने सावरकरांना नव्हे, तर नथुराम गोडसेला ‘भारतरत्न’ द्यायला हवे. गोडसेने गांधीजींची हत्या केली, तर सावरकर फक्त त्या हत्याकटाचे सूत्रधार होते- मनीष तिवारी काँग्रेस

सावरकर नसते तर 1857 च्या स्वातंत्र्यलढय़ाची नोंद इतिहासात झालीच नसती!

स्वातंत्र्यवीर सावरकर नसते तर 1857 च्या स्वातंत्र्यलढय़ाची नोंद इतिहासात झालीच नसती. या लढय़ाकडे आपण इंग्रजांच्या दृष्टिकोनातूनच पाहत राहिलो असतो, अशा शब्दांत भाजपाध्यक्ष केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेस आणि डाव्यांना सुनावले आहे. सावरकरांमुळेच या लढय़ास पहिल्या स्वातंत्र्यलढय़ाचे नाव मिळाले, असे ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या