काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात तक्रार, पोलिसांनी नोंदवला रणजित सावरकर यांचा जबाब

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत टीका केली होती. त्या तक्रारीची दखल घेऊन आज शिवाजी पार्क पोलिसांनी रणजित सावरकर यांचा जबाब नोंदवला.

भारत जोडो यात्रेदरम्यान वाशिम येथील सभेत राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका केली होती. राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेचे पडसाद राज्यात उमटले. टीका केल्याप्रकरणी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. आज दुपारी रणजित  सावरकर हे शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात आले. पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवून घेतला आहे.

राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान सावरकरांनी शिक्षा रद्द करावी यासाठी इंग्रजांची माफी मागितली. ते इंग्रजांकडून पेन्शन घ्यायचे आणि काँग्रेसच्या विरोधात काम करायचे, असा आरोप केला होता. यावर महाराष्ट्रातून राहुल गांधी यांच्यावर टीका झाली होती.