स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी ठोकले शिरोळ तहसील कार्यालयाला टाळे

42

सामना प्रतिनिधी । जयसिंगपूर

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी दुपारी शिरोळ तहसीलदार कार्यालयास टाळे ठोकले. शेतकऱयांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे, शेतीमालाला हमीभाव मिळाला पाहिजे, रंगराजन समितीच्या शिफारशी लागू करा, अशा घोषणा यावेळी आंदोलकांनी दिल्या.

शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा यावेळी शिरोळ पंचायत समिती सदस्य सचिन शिंदे, माजी सभापती सुवर्णा अपराज, सागर संभूशेटे यांनी दिला. आंदोलनात विश्वास बालिघाटे, शीतल कंठी, शैलेश चौगुले, शैलेश आडके, मायगोंडा पाटील यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. शिरोळ येथील गावचावडीस स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने टाळेठोक आंदोलन करण्यात आले. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त होता.

आपली प्रतिक्रिया द्या