एवढंच बाकी होतं! लैंगिक संबंधांना खेळ म्हणून मान्यता, ‘या’ देशात भरणार पहिली सेक्स चॅम्पियनशिप

प्रातिनिधिक फोटो

जगभरातील देशांमध्ये विविध खेळ खेळले जातात. देश बदलतो तसे तिथले खेळही बदलतात. परंतु कधी लैंगिक संबंधांना खेळ म्हणून मान्यता मिळेल याची कल्पनाही कोणी केली नसेल. परंतु याला खेळ म्हणून मान्यता मिळाली असून याची स्पर्धाही आयोजित केली जाणार आहे. होय, तुम्ही जे वाचताय ते खरे आहे. लैंगिक संबंधांना आता खेळ म्हणून मान्यता मिळाली असून याची पहिली चॅम्पियनशिपही आयोजित करण्यात आली आहे. स्वीडनमध्ये ही चॅम्पियनशिप होणार आहे. स्वीडनच्या गोल्डबर्ग शहरामध्ये ही चॅम्पियनशिप होणार आहे.

वृत्तानुसार, ‘स्वीडिश सेक्स फेडरेशन’तर्फे जगातील पहिली युरोपियन सेक्स चॅम्पियनशिप आयोजित करण्यात आली आहे. 8 जूनपासून ही चॅम्पियनशिप सुरू होईल. यासाठी 20 देशांनी नोंदणीही केली आहे. अनेक आठवडे ही स्पर्धा खेळली जाणार असून या स्पर्धेसाठी काही विशेष अटी ठेवण्यात आल्या आहेत.

सेक्स चॅम्पियनशिपमध्ये विजेत्यांची निवड देखील खास पद्धतीने केली जाणार आहे. ही स्पर्धा अनेक आठवडे चालणार आहेत. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना दररोज 6 तास ही स्पर्धा खेळावी लागणार आहे. प्रत्येक स्पर्धकाकडे 45 मिनिटं ते एक तासाचा वेळ दिला जाणार आहे.

दरम्यान, ही स्पर्धा 16 प्रकारच्या भागात खेळवली जाणार आहे. यात सिडक्शन, ओरल सेक्स, मसाज, सर्वात सक्रिय जोडपे आदी गोष्टींचा समावेश आहे. युरोपियन सेक्स चॅम्पियनशिपच्या विजेत्यांची निवड ही तीन परिक्षक आणि प्रेक्षकांची दिलेले रेटिंग एकत्र करून करण्यात येणार आहे. विजेता ठरवताना ज्युरींचा निर्णय 30 टक्के विचारात घेतला जाईल तर प्रेक्षकांचा निर्णय 70 टक्के विचारात घेतला जाणार आहे. या दोन्ही मतांचे मुल्यांकन करून त्या आधारावर विजेता ठरवला जाणार आहे.

दरम्यान, ‘स्वीडिश सेक्स फेडरेशन’चे अध्यक्ष ड्रॅगन ब्रॅटिक यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, सेक्सला एक खेळ अशी मान्यता दिल्याने लोकांमधील मानसिक आणि शारिरिक आरोग्य चांगले होण्यास प्रोत्साहन मिळेल. या शिवाय निषिद्ध मानल्या जाणार्‍या सेक्सबद्दल लोकांच्या मतांमध्ये उदारता येऊ शकेल.