नवरात्र स्पेशल रेसिपी..रताळ्याची भाजी

सामना ऑनलाईन। मुंबई

साहित्य...दोन मध्यम आकाराची रताळी, ३ चमचे तूप ,जीरे , अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट ५-७ हिरव्या मिरच्या,नारळाचा किस, चवीनुसार मीठ ,चवीनुसार साखर ,४ चमचे किसलेलं खोबरं

कृती...रताळी स्वच्छ धुऊन घ्यावीत. त्यानंतर सोलून किसून घ्या. एका मध्यम आकाराच्या कढईत तूप गरम करा. त्यात जिरे टाका. जिरे तडतडले कि मिरच्या बारीक कापून टाका. नंतर रताळ्याचा किस घालावा. पाच मिनिट मंद आचेवर हा किस परतावा. त्यात थोडेसे पाणी शिंपडावे. जेणेकरुन किस लवकर शिजेल. किस शिजल्यानंतर त्यात मीठ, शेंगदाण्याचा कूट, साखर आणि खोबरं किसून घालावं.

आपली प्रतिक्रिया द्या