पॅरा जलतरणपटू कर्माकरची दिल्ली हायकार्टाकडे धाव

अर्जुन पुरस्कार विजेता पॅरा जलतरणपटू पी. कर्माकर याने आपल्यावरील तीन वर्षांच्या निलंबनाची शिक्षा मागे घेण्यात यावी यासाठी नवी दिल्लीतील हायकोर्टाकडे धाव घेतली आहे. या प्रकरणाची सुनावणी 23 सप्टेंबरला होण्याची शक्यता आहे.

वकील अमितकुमार शर्मा व सत्यमसिंह राजपूत यांच्याकडून याबाबची याचिका दाखल करण्यात आली आहे. यामध्ये हिंदुस्थानी पॅरालिम्पिक समितीकडून (पीसीआय) लादण्यात आलेले निलंबन मागे घेण्यात यावे अशा प्रकारची मागणी करण्यात आलेली आहे. तसेच यामध्ये पीसीआयकडून आयोजित करण्यात येणाऱया पॅरा जलतरण स्पर्धांमध्येही सहभागी होण्यासाठी परवानगी देण्यात यावी असा उल्लेखही करण्यात आलेला आहे. पीसीआयकडून कायदा तोडून निलंबनाची शिक्षा सुनावण्यात आल्याचेही याचिकेत म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या