‘स्वाइन फ्लू’चे थैमान सुरूच, तीन महिन्यांत १८ बळी

11

सामना ऑनलाईन, नाशिक

नाशिक जिल्ह्यात वातावरणातील बदलामुळे ‘स्वाइन फ्लू’चे थैमान सुरूच आहे. गेल्या तीन महिन्यात १८ जणांचा मृत्यू झाला आहे. नाशिक शहरातील रुग्णालयांमध्ये स्वाइन फ्लूचे निदान झालेल्या व सदृश अशा २६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जानेवारीपासून जिल्ह्यात स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली. जानेवारी ते ४ एप्रिल या कालावधीत जिल्ह्यात ७१ रुग्णांवर उपचार केले आहेत, त्यापैकी ७० रुग्ण स्वाइन फ्लू पॉझिटीव्ह असल्याचे निदान झाले असून, त्यातील ३३ रुग्ण शहरातील, तर ३८ ग्रामीण भागातील आहेत. फेब्रुवारीपासून आतापर्यंत शहरातील ५, तर ग्रामीण भागातील १३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षात सात रुग्ण उपचार घेत आहेत. या रुग्णालयात सोमवारी एका तरुणाचा मृत्यू झाला, तो मूळचा उत्तर प्रदेशातील रहिवाशी असून, नाशिकमध्ये नातेवाईकांकडे आला होता, अशी माहिती रुग्णालय सूत्रांनी दिली.

 

आपली प्रतिक्रिया द्या