गुजरातमध्ये स्वाईन फ्लूचा कहर

18

सामना ऑनलाईन । अहमदाबाद

गुजरातमध्ये स्वाईन फ्लू आजाराने कहर केला आहे. रविवारी एकाच दिवसात गुजरातमध्ये ११ जणांचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला. स्वाईन फ्लूमुळे मागील १२ महिन्यात गुजरातमध्ये २०८ जणांचा मृत्यू झाला आहे. अहमदाबादमध्ये तब्बल ५०० जणांना स्वाईन फ्लूची लागण झाली आहे. सरकारी रूग्णालयांबरोबरच खासगी रूग्णालयातही रूग्णांची गर्दी वाढत असल्याने वैद्यकीय सेवेचा पुरता बोजवारा उडाला आहे.

अहमदाबादसह गुजरातमधील अनेक जिल्ह्यांमध्ये स्वाईन फ्लूने हातपाय पसरायला सुरूवात केली आहे. राज्यभरात १८८३ जणांना स्वाईन फ्लूची लागण झाली. यापैकी ६८१ रूग्ण बरे झाले असून ९९४ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. स्वाईन फ्लूने २०८ जणांचा मृत्यू झाला आहे. यातील ५५ रूग्ण अहमदाबाद, आणि ३१ जण बडोदयातील रहिवासी आहे. सूरतमध्येही स्वाईन फ्लूच्या रूग्णांमध्ये वाढ होत आहे. सौराष्ट्र आणि कच्छमध्येही स्वाईन फ्लूचे रूग्ण आढळले आहेत.

परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारतर्फे विशेष उपाययोजना करण्यात येत आहेत. सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे दिसताच नागरिकांनी ताबडतोब जवळच्या सरकारी रूग्णालयात आवश्यक त्या तपासणी करून घ्याव्यात असे आवाहन गुजरात सरकारने नागरिकांना केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या