फक्त शेकहँड केला आणि पाकिस्तानी पत्रकारांची बोलती बंद झाली

5154

कलम 370 रद्द करण्याच्या मुद्दावरून संयुक्त राष्ट्रांसमोर पाकडे तोंडावर आपटले आहे. यानंतर संयुक्त राष्ट्रातील हिंदुस्थानचे प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन यांच्यासमोर काही पाकिस्तानी पत्रकारांनी शहाणपणा करण्याचा प्रयत्न केला. अकबरुद्दीन यांनी त्यांच्याशी फक्त हस्तांदोलन करत त्यांची बोलतीच बंद करून टाकली.

हिंदुस्थानने कश्मीरमध्ये असलेले कलम 370 रद्द करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे बिथरलेल्या पाकिस्तानने गळा काढत हा मुद्दा संयुक्त राष्ट्रांसमोर उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. मात्र इथेही पाकडे तोंडावर आपटले. संयुक्त राष्ट्रासमोर हिंदुस्थानची बाजू भक्कमपणे सादर करण्यात हिंदुस्थानचे संयुक्त राष्ट्रातील प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली ज्यात त्यांना पाकिस्तानी पत्रकारांनी प्रश्न विचारला होता. या पत्रकारांनी त्यांना विचारले की पाकिस्तानशी चर्चेला केव्हा सुरुवात होणार आहे. यावर अकबरुद्दीन हे त्या पत्रकारांकडे गेले आणि हस्तांदोलन करत म्हणाले की “चला तुमच्यापासूनच सुरूवात करूयात” त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे पाकिस्तानी पत्रकारांना पुढे काय बोलावे हे सुचलंच नाही.

आपली प्रतिक्रिया द्या