सोमय्यात रंगणार सिंफनी महोत्सव

46

कला, नृत्य, संगीत, पाककला अशा स्पर्धा, भव्य सजावट, लज्जतदार स्टॉल्स असे एकापेक्षा एक भन्नाट इव्हेंट विद्यार्थ्यांना अनुभवता येणार आहे. निमित्त आहे ते के.जे.सोमय्या अभियांत्रिकी शाखेच्या ७ ते ९ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सिंफनी महोत्सवाचे. यंदाच्या या उत्सवात ‘रेड बुल टूर बस’ हे सर्वांचेच आकर्षण ठरणार असून या महोत्सवाचे माध्यम प्रायोजक दैनिक ‘सामना’ आहे. के.जे.सोमय्याच्या महाविद्यालयाच्या हा महोत्सव म्हणजे विद्यार्थ्यांसाठी पर्वणीच. विद्यार्थ्यांच्या कलेला वाव मिळण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळावे हा या महोत्सवाचा उद्देश आहे. या महोत्सवाला अनेक सेलिब्रिटीज कलाकारांची उपस्थिती असणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या