टी20 वर्ल्ड कपमध्ये युगांडाचा संघ प्रथमच आपलं नशीब आजमवण्यासाठी उतरला आहे. विशेष म्हणजे या संघात टी20 वर्ल्ड कप 2024 मधील सर्वात वयस्कर 43 वर्षीय खेळाडू फ्रँक नसुबुगा खेळताना दिसत आहे. युगांडाचा पहिला सामना पापुआ न्यु गिनी विरुद्ध पार पाडला या सामन्यात फ्रँकने इतिहास रचला आहे.
PNG Vs UGA यांच्यामध्ये टी20 वर्ल्ड कपमधील 9 वा सामना गयानाच्या प्रेविडेंस स्टेडियमवर पार पाडला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पीएनजीचा संपुर्ण संघ 77 या धावसंख्येवर माघारी परता. लक्षाचा पाठलाग करण्यासाठी उतरेल्या युगांडाने 19 व्या षटकात लक्षाचा यशस्वी पाठलाग करत विजय संपादित केला. युगांडाच्या गोलंदाजांनी केलेल्या प्रभावी माऱ्यामुळेच पीएनजीला मोठी धावसंख्या उभारता आली नव्हती. युगांडाकूडन 43 वर्षीय फ्रँक नसुबुगाची गोलंदाजी निर्णायक ठरली. फ्रँकने चार षटकांमधील दोन षटके निर्धाव टाकली आणि 1 च्या सरासरीने 2 विकेट घेतल्या. फ्रँकने दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज एन्रीच नॉर्खिया चा रेकॉर्ड मोडित काढला. एन्रीचने याच वर्ल्ड कपमध्ये श्रीलंके विरुद्ध चार षटके टाकून फक्त 7 धावा देत 4 विकेट घेतल्या होत्या.
नसुबुगा टी20 वर्ल्ड कपच्या इतिहासात एकाच सामन्यात 20 चेंडू निर्धाव टाकणारा जगातील दुसरा गोलंदाज ठरला आहे. या यादीत पहिल्या क्रमांकावर श्रीलंकेचा फिरकीपटू अजंता मेंडिस आहे. याचबरोबर नसुबुगा टी20 वर्ल्ड कपमध्ये विकेट घेणारा दुसरा सर्वाधिक वयस्कर खेळाडू ठरला आहे. या यादीत पहिल्या क्रमांकावर हॉंगकाँगचा रेयान कॅम्पबेल आहे. त्याने 2016 च्या टी20 वर्ल्ड कपमध्ये वयाच्या 44 व्या वर्षी अफगाणिस्तान विरुद्ध 4 षटकांमध्ये 28 धावा देत 2 विकेट घेतल्या होत्या.