T20 World cup – हिंदुस्थान-पाकिस्तान भिडणार, ‘या’ दिवशी रंगणार सामना

टी-20 चा वर्ल्डकप येत्या 17 ऑक्टोबरपासून दुबईमध्ये सुरू होणार आहे. या स्पर्धेत हिंदुस्थान-पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी एकमेकांना भिडणार आहेत. हिंदुस्थान व व पाकिस्तान हे एकाच गटात असल्याने हे दोघे संघ आमने सामने येणार आहेत. या संघामधील सामना 24 ऑक्टोबरला होणार आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील मानाची समजली जाणारी ही स्पर्धा 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर या कालावधीत ओमान व यूएई या देशांमध्ये खेळवण्यात येणार आहे. हिंदुस्थान ज्या गटात आहे त्या गटात न्यूझीलंड व अफगाणिस्तान हे संघ आहेत तर दुसऱ्या गटात इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका व वेस्ट इंडीज या संघांचा समावेश आहे.

आयसीसी टी-20 वर्ल्ड कप सुपर 12 फेरीतील गटवारी
गट एक
इंग्लंड
ऑस्ट्रेलिया
दक्षिण आफ्रिका
वेस्ट इंडीज
अ गटातील विजेता
ब गटातील उपविजेता

गट दोन
हिंदुस्थान
पाकिस्तान
न्यूझीलंड
अफगाणिस्तान
अ गटातील उपविजेता
ब गटातील विजेता

पहिल्या फेरीतील गटवारी
गट ए
श्रीलंका
आयर्लंड
नेदरलॅण्ड
नामिबीया

गट बी

बांगलादेश
स्कॉटलंड
पप्पूआ न्यू गिनीया
ओमान

आपली प्रतिक्रिया द्या