क्रिकेट टी-20 वर्ल्डकपच्या बाबतीत मोठी बातमी, वाचा सविस्तर

1571

कोरोना व्हायरसने सध्या जगभरात थैमान घातले आहे. अनेक देशात लॉकडाऊन लागू केल्यामुळे सर्व काही ठप्प आहे. क्रिकेटसह सर्वच खेळांच्या स्पर्धा देखील पुढे ढकलल्या आहेत. आता या कोरोना व्हायरसचा फटका या वर्ष अखेरीस  होणाऱ्या टी20 वर्ल्डकपला बसणार असल्याचे समजते. यावर्षी होणारी स्पर्धा पुढे ढकलण्यात आली असून ही स्पर्धा आता 2022 किंवा त्यानंतर खेळविण्यात येणार असल्याची चर्चा आहे. अद्याप याबाबत अधिकृत काहीही जाहीर करण्यात आलेले नाही. मात्र एएनआयने आयसीसीच्या सूत्रांच्या हवाल्याने याबाबत ट्विट केले आहे.

याआधी कोरोना व्हायरसमुळे 29 मार्चला सुरू होणारी आयपीएल ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आहे. ही स्पर्धा पुढिल वर्षी फेब्रुवारी मार्च मध्ये होणार असल्याची चर्चा आहे.

आपली प्रतिक्रिया द्या